Post Office Scheme पोस्ट ऑफिसच्या या योजनेमधून मुलींना मिळणार 65 लाखांपर्यंतचा फायदा असा करा अर्ज

Post Office Scheme नमस्कार मित्रांनो आज आपण भारत सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. भारत सरकारने ही योजना 2015 मध्ये बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमे अंतर्गत चालू केली. ही योजना सुरू करताना भारत सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक म्हणजेच पैशांची मदत व्हावी हा मुख्य हेतू लक्षात घेतलेला होता.

Sukanya samriddhi yojana ही योजना दीर्घकाळापर्यंत चालते आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चांगला व्याजदर दिला जातो आणि ही योजना करमुक्त आहे म्हणजे तुम्हाला या योजनेतून मिळणाऱ्या परताव्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

या योजनेचे आपण काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.

  • पहिला मुद्दा असा की ही योजना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बनवलेले आहे.
  • तसेच ही योजना भारत सरकारने चालू केलेली असल्यामुळे येथे कोणतीही फसवीगिरी होणार नाही, त्यात कोणताही धोका नाही,
  • आणि इतर कोणत्याही बचत योजनेच्या तुलनेत या योजनेमध्ये लाभार्थ्यांना जास्त व्याजदर मिळतो
  • पालकांना या योजनेच्या परताव्यावर कोणताही कर द्यावा लागत नाही

 Features of this plan या योजनेची वैशिष्ट्ये पाहूया

ही योजना संपूर्णतः भारत सरकार द्वारे चालवली जाते. त्यामुळे  तुम्ही केलेली गुंतवणूक ही संपूर्णपणे सुरक्षित असते. या योजनेचा कालावधी हा 21 वर्ष आहे.  या योजनेमध्ये तुम्ही जमा केलेले रक्कम त्यावर मिळालेले व्याज आणि 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिळालेला परतावा या सर्व गोष्टी करमुक्त आहेत.

या योजनेसाठी तुम्हाला खाते उघडण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, ते म्हणजे कोणतेही पालक त्यांच्या दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी हे खाते उघडू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी पैसे हे 250 रुपये भरावे लागतील आणि जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता.या योजनेतून मिळणारे पैशांचा उपयोग तुम्ही मुलीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी करू शकता. तसेच या योजनेतून पैसे काढण्यासाठी तुम्हाला मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच शक्य आहे.

How to open an account खाते कसे उघडायचे

त्यासाठी पहिली अट अशी आहे की मुलीचे वय हे दहा वर्षापेक्षा कमी असावे लागेल. तसेच मुलीचे पालक हे खाते उघडू शकतात.
यामध्ये तुम्हाला एका मुलीसाठी एकच खाते उघडावे लागेल आणि तुम्ही एकच खाते उघडू शकतात. तसेच तुम्हाला दोन मुली असतील तर तुम्ही दोन मुलींसाठी वेगवेगळे खाते उघडू शकता. तसेच तुम्हाला तीन मुली असतील तर तुम्ही तीन मुलींसाठी खाते उघडू शकत नाही यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच खाते उघडता येतील.

हे खाते उघडण्यासाठी तुम्ही गावातील शहरांमधील पोस्ट ऑफिस (Post Office Scheme)  तसेच नॅशनलाईज बँक SBI ,PNB,HDFC, Axis ICICI ,अशा विविध खात्यांमध्ये बँकांमध्ये खाते उघडू शकतात हे खाते तुम्ही ऑनलाईन ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने उघडू शकता.

Required documents आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा फायदा घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पहिला म्हणजे

  • मुलीचा जन्म दाखला
  • पालकांच्या ओळखीचा पुरावा यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी गोष्टी वापरू शकता
  • तुमच्या घराच्या पत्त्याचा पुरावा रेशन कार्ड वीज बिल इत्यादी
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो.

Investment rules गुंतवणुकीचे नियम

चला तर आपण आता गुंतवणुकीचे नियम पाहू यामध्ये तुम्हाला कमीत कमी दरवर्षी 250 रुपयांची गुंतवणूक करावीच लागेल. तसेच तुम्ही जास्तीत जास्त दीड लाखांची प्रतिवर्ष गुंतवणूक करू शकता. हे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला किमान दरवर्षीपा 250 रुपये हे भरावीच लागतील नाहीतर खाते बंद पडते. हे पैसे तुम्हाला पंधरा वर्षांसाठी जमा करावे लागतात आणि मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खाते बंद करू शकता.

Interest rate व्याजदर

या योजनेसाठी भारत सरकारने व्याजदर हा 7.6% जारी केलेला आहे. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीचा वापर करून हे तुमचे व्याज परत जोडले जाते. उदाहरणार्थ जर तुम्ही दरवर्षी दीड लाख रुपये खात्यामध्ये जमा केले तर तुम्हाला 21 वर्षानंतर 65 लाख रुपये मिळतात. हे खाते 21 वर्षांसाठी चालू राहते तसेच यामध्ये तुम्हाला कमीत कमी 15 वर्षांसाठी पैसे ठेवणे हे बंधनकारक आहे आणि उरलेल्या सहा वर्षांसाठी तुम्हाला व्याज दिले जातात.

जर तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जर काढायचे असतील तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यामधील 50% रक्कम काढू शकता आणि योजनेच्या खात्याला 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते आपोआप बंद होते आणि उर्वरित रक्कम ही मुलीच्या खात्यात जमा होते

काही अडचण असल्यास किंवा अचानक आलेल्या परिस्थितीमुळे जर खाते बंद करायचे असेल तर आपण ते बंद करू शकता. जर खाते चालू करून पाच वर्षे झाल्यानंतर जर तुम्हाला पुढे खाते चालवणे शक्य नसेल तर तुम्ही पाच वर्षानंतर सरकारच्या परवानगीने खाते बंद करू शकता. जर काही परिस्थितीमध्ये मुलीचा मृत्यू झाल्यास या योजनेची रक्कम ही पालकाला मिळते. तसेच मुलीला काही गंभीर आजार झाला तर योग्य कागदपत्र दाखवून तुम्ही ती रक्कम काढू शकता.

 

 

Leave a Comment