या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता

PM kisan 19th installment नमस्कार मित्रांनो आज आपण भारत सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना केंद्र सरकारतर्फे चालवली जाते. योजनेचा उद्देश म्हणजे की देशातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी बँक खात्यामध्ये 6000 रुपये जमा केले जातात. भारतातील कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचे आर्थिक हालत चांगली करण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे.

या योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आलेली आहे. आधी ही योजना छोट्या स्तरांवर राबवली गेली, त्यानंतर 1 जून 2019 पासून ही सर्व शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली. ही योजना कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय द्वारा चालवली जाते.

मित्रांनो या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा म्हणजे प्रतिवर्ष तुम्हाला 6000 रुपये मिळतात. हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशाप्रकारे विचारीत केले जातात.

हे पैसे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी DBT या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. जेणेकरून हे पैसे मधात कोणीही भ्रष्टाचार करून स्वतःच्या खिशात घालू शकणार नाही.

या योजनेच्या मिळणाऱ्या पैशांमधून शेतकरी बी बियाणे कीटकनाशके खत खरेदी करू शकतात .

Eligibility पात्रता

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला भारताचा नागरिक असणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या नावावर जमीन असणं म्हणजे सातबारा असणं आवश्यक आहे. अल्पभूधारक शेतकरी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत जमीन असेल तरच लाभ घेऊ शकता दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Disqualification अपात्रता

या योजनेचा लाभ खासदार, आमदार, मंत्री, महापौर इत्यादींना मिळत नाही. तसेच केंद्र सरकारचे कर्मचारी यांना लाभ भेटत नाही. तसेच या योजनेमधून डॉक्टर वकील इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक अशा विविध क्षेत्रातील लोकांना वगळण्यात आलेले आहे. आणि जे लोक दरवर्षी आयकर भरतात अशा लोकांनाही या योजनेतून वगळण्यात आलेला आहे.

Application अर्ज

या योजनेसाठी तुम्ही घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकता पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि सातबारा तसेच मोबाईल नंबर या गोष्टींची आवश्यकता पडेल. जर तुम्हाला स्वतः फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सीएससी केंद्र या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता.

ज्या योजनेत दिलेल्या माहितीनुसार पहिला हप्ता तो म्हणजे 1 एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान पडतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या दरम्यान पडतो आणि तिसरा आता 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान पडतो.

या योजनेची गावानुसार लाभार्थी यादी सुद्धा केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. ती यादी पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिथे बेनिफिशियरी स्टेटस म्हणून यादी बघू शकता.

या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे कीटकनाशक खरेदी करण्यासाठी मदत झालेली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुद्धा या योजनेचा फायदा झालेला आहे. या योजनेबद्दल काही अडचण असल्यास केंद्र सरकार तर पेट्रोल फ्री हेल्पलाइन नंबर देण्यात आलेले आहे ते खालील प्रमाणे आहेत.

📞 टोल-फ्री हेल्पलाइन नंबर:

  • 155261 / 1800-115-526 (कृषि मंत्रालय)
  • 011-23381092 (PM-KISAN हेल्पडेस्क)

📧 ईमेल:

🌐 आधिकारिक वेबसाइट:
https://pmkisan.gov.in/

योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेची 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता आता 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

याबद्दल केंद्र सरकारने अजूनही कोणती अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु लवकरच 31 मार्च च्या आत मध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.

Leave a Comment