Maruti suzuki price hike नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की मारुती सुझुकी या कंपनीच्या गाड्या सर्व लोकांमध्ये किती प्रसिद्ध आहेत. आता याच कंपनीने 1 फेब्रुवारी 2025 पासून त्यांच्या संपूर्ण गाड्यांच्या किमतींमध्ये वाढ करण्याचे ठरवलेले आहे आणि त्यांनी त्या संदर्भात घोषणा देखील केली आहे.
गाड्या बनवण्यासाठी वाढणारा खर्च आणि महागाई या सर्व गोष्टींचा परिणाम वाढत्या किमतीवर दिसत आहे. सर्व प्रकारच्या मॉडेल्समध्ये आता 1500 ते 32 हजार 500 रुपयांपर्यंत वाढ निश्चित करण्यात आलेली आहे.
या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत की वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांवर काय परिणाम होईल ? तसेच बाजारपेठेवर काय परिणाम होईल ? आणि ऑटोमोटिव्ह म्हणजेच कार उत्पादक कंपन्यांच्या उद्योगात काय परिणाम होईल ? तसेच येणाऱ्या काळामध्ये इतर कंपन्या त्यांचे भविष्य धोरण कसे तयार करतील या संदर्भात आपण माहिती घेऊ.
मारुती सुझुकी कंपनीने किंमत वाढवण्यासाठी काही नियम फिक्स केलेले आहेत. त्यामुळे त्या किमतींच्या दरम्यान असलेल्या गाड्यांची किंमत ही विशिष्ट प्रकारे वाढवलेली आहे. मारुती सुझुकी या कंपनीला किंमत वाढवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे इतर कंपन्यांच्या गाडीशी होणार स्पर्धा. जास्त किंमतही वाढून काही उपयोग होणार नाही मार्केटमध्ये राहायचे असेल तर इतर कंपन्यांच्या गाड्यांनी इतकीच किंमत वाढवावी लागेल.
Name of the vehicle and the price to be increased गाडीचे नाव आणि वाढवण्यात येणारी किंमत
अल्टो के१० – | १९,५०० रुपयांपर्यंत |
एस-प्रेसो – | ५,००० रुपयांपर्यंत |
सेलेरियो- | ३२,५०० रुपयांपर्यंत |
वॅगन आर – | १५,००० रुपयांपर्यंत |
स्विफ्ट – | ५,००० रुपयांपर्यंत |
डिझायर – | १०,००० रुपयांपर्यंत |
ब्रेझा – | २०,००० रुपयांपर्यंत |
एर्टिगा – | १५,००० रुपयांपर्यंत |
इको – | १२,००० रुपयांपर्यंत |
सुपर कॅरी – | १०,००० रुपयांपर्यंत |
इग्निस – | ६,००० रुपयांपर्यंत |
बॅलेनो – | ९,००० रुपयांपर्यंत |
सियाझ – | १,५०० रुपयांपर्यंत |
एक्सएल६ – | १०,००० रुपयांपर्यंत |
फ्रँक्स(Fronx) – | ५,५०० रुपयांपर्यंत |
इन्व्हिक्टो – | ३०,००० रुपयांपर्यंत |
जिम्नी (Jimny)- | १,५०० रुपयांपर्यंत |
ग्रँड विटारा – |
सेलेरिओ या सुझुकीच्या मॉडेल्समध्ये सर्वात जास्त किंमत वाढवून देण्यात आलेली आहे. तसेच स्विफ्ट आणि डिझायर यांसारख्या गाड्यांमध्ये मोजक्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. तसेच स्विफ्ट आणि डिझायर हे मॉडेल्स सुझुकी कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल्स आहेत.
ज्या गाड्या मार्केटमध्ये सर्वात जास्त विकल्या जातात अशा गाड्यांच्या किमतींमध्ये गरजेपेक्षा जास्त किंमत वाढवण्यात आलेली नाही. सुझुकी कंपनीच्या सर्वात कमी किमतीच्या असणाऱ्या अल्टो के10 आणि एक्सप्रेसो या गाड्यांमध्ये कमी प्रमाणात पैशांची वाढ करण्यात आलेली आहे. कारण या किमतीच्या बजेट मधील गाड्या सुझुकी साठी खूप महत्त्वाच्या आहेत.
सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय असणाऱ्या आणि सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या व्हॅगनार आणि स्विफ्ट या गाड्यांमध्येही किमती वाढवण्यात आलेल्या आहेत. परंतु किंमत वाढवताना या गाड्यांची लोकप्रियता आणि विक्रीचा खप पाहून किंमत वाढवण्यात आलेली आहे.
स्विफ्ट डिझायर ही गाडी सेडन या विभागामध्ये येत असल्यामुळे या गाडीची स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या गाडीची किंमत वाढवतानाही सुझुकीने खूप विचार केलेला आहे.
SUV प्रकारच्या गाड्यांमध्ये सुझुकीच्या Brezza, Ertiga, fronx, Grand Vitara, Gemini या गाड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या प्रकारातील गाड्यांमध्ये सुझुकीने मोठ्या प्रमाणात पैशांची वाढ केलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या गाड्यांची विक्री कमी होती की वाढते हे पाहणं गरजेचं ठरेल.
त्यानंतर सुझुकीच्या प्रीमियम प्रकारच्या गाड्यांमध्ये येणाऱ्या XL6,Invicto,Ciaz या गाड्यांच्या किमतीतील मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे.
Reasons for raising prices किमती वाढवण्यामागची कारणे
गाड्यांच्या किमती वाढवण्यामागे मारुती सुझुकी ने काय कारण दिलेले आहे ते पाहूया. यासाठी सुझुकीने महत्त्वाचे दोन कारणे दिलेले आहेत पहिला म्हणजे इनपुट खर्च आणि दुसरा म्हणजे ऑपरेशनल खर्च.
कच्च्या मालामध्ये जर आपण पाहिलं तर गाडी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टील ऍल्युमिनियम आणि मौल्यवान इतर धातूंसारख्या प्रमुख कच्च्या मालांच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्याने त्याचा डायरेक्ट परिणाम किमती वाढण्यामध्ये झाला आहे.
मित्रांनो दुसरे कारण म्हणजे वाढता इंधन खर्च गाड्यांची ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक करणे, दळणवळण या सर्व गोष्टींमुळे कंपनीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
कंपनीने वाढवलेल्या किमतींमुळे आता ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे आणि तो आता येणाऱ्या काळात दिसून येईल वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांच्या पसंतीमध्ये बदल होऊ शकतो ग्राहक आता वाढलेल्या किमतीनुसार इतर चांगले पर्याय किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतींमध्ये भेटणारे चांगले पर्याय यांकडे कल जाऊ शकतो किंवा ग्राहक शोधू शकतात.