Mahindra Bolero मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे गाव खेड्यांमध्ये सर्वात पसंतीस असणारी आणि मजबूत गाडी म्हणजे महिंद्रा बोलेरो. या गाडीला गावाकडच्या लोकांनी खूप पसंती दिलेली आहे. या गाडीची ओळख ही मजबुती, जास्त मायलेज आणि आरामदायक बैठक या गोष्टींसाठी आहे. ही गाडी सरासरी परिवारांसाठी वापरली जाते. या गाडीमध्ये 7 सीटर 9 सीटर अशा वेगवेगळ्या गाड्या उपलब्ध आहेत. तर आज आपण 9 सिटर या गाडीची माहिती घेणार आहोत.
महिंद्रा बोलेरो डिझेल एक्सटेरियर (Design & Exterior)
महिंद्रा बोलेरो गाडीची डिझाईन ही रफ अँड टफ असल्याने ही कसल्याही रस्त्यावरून चालते. या गाडीमध्ये कंपनीने मस्क्युलर फ्रंट ग्रील देण्यात आलेला आहे. जेणेकरून हिचा लुक दमदार येतो. मोठे आणि शार्प हेड लॅम्प या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि हेडलाईनच्या खाली हॅलोजन लाईट सुद्धा देण्यात आलेले आहेत.
महिंद्रा बोलेरो गाडीमध्ये समोरच्या साईडने एक मोठा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे. जेणेकरून ही गाडी कितीही खराब रस्त्यावरून चालू शकते. तसेच या गाडीमध्ये मजबूत स्टील बॉडी देण्यात आलेले आहे. जी आपल्याला अपघातापासून सुरक्षेचा देतो. कंपनीतर्फे या गाडीमध्ये ड्युअल टोन बॉडी कलर देण्यात आलेला आहे जेणेकरून ही गाडी स्टायलिश दिसेल.
महिंद्रा बोलेरो इंटिरियर आणि कम्फर्ट (Interior & Comfort)
महिंद्रा बोलेरो गाडीचे इंटिरियर अशाप्रकारे डिझाईन केलेले आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा लांबच्या यात्रेला जातात तेव्हा तुम्हाला आराम मिळेल. या गाडीमध्ये नऊ लोकांची आसन क्षमता आहे. समोरच्या साईडला दोन लोक, मधल्या साईडला तीन लोक आणिच मागच्या साईडला चार लोक अशी शीटची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला आरामदायक शीट आणि कुशन चांगल्या प्रकारे देण्यात आलेले आहेत.
या गाडीमध्ये ड्रायव्हर साठी ही पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. जेणेकरून त्याला ड्रायव्हिंग करताना मदत होते. या गाडीमध्ये तुम्हाला ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेला आहे. उन्हाळ्यासाठी एसी आणि हिवाळ्यासाठी हीटर या दोन्ही गोष्टींची सुविधा या गाडीत देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये मोठा बूट स्पेस म्हणजेच देखे जेणेकरून यामध्ये आपण जास्तीत जास्त सामान ठेवू शकतो.
इंजन आणि परफॉर्मन्स (Engine & Performance)
ही गाडी मजबूत इंजिन आणि भारी परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. या गाडीमध्ये तुम्हाला एक पॉईंट पाच लिटर तीन सिलेंडर इंजिन भेटते ज्याच्यामध्ये 75 बीएचपी आणि तीन हजार सहाशे रुपये मिळतो. या गाडीमध्ये पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. या गाडीला ऑफरोडींग साठी चांगल्या प्रकारे गिफ्ट देण्यात आलेला आहे गाडीचे सस्पेन्शन हे खूप चांगले आहेत.
- Diesel engine: 1.5 liter, 3-cylinder mHawk engine.
- Power Output: 75 BHP @ 3600 RPM.
- Torque: 210 Nm @ 1600-2200 rpm.
- 5-speed manual gearbox.
- Drive modes: Standard and Eco mode.
- 4×2 and 4×4 drive options.
सेफ्टी फीचर्स (Safety Features)
तर मित्रांनो आता आपण पाहूया या गाडीमध्ये सेफ्टी फीचर्स काय काय दिलेले आहेत. सर्वप्रथम या गाडीमध्ये तुम्हाला समोरच्या साईडला दोन एअरबॅक्स देण्यात आलेले आहेत. एक एअर पैकी पॅसेंजर साईटने आणि एक ड्रायव्हर साईडने देण्यात आलेले आहेत. तसेच या गाडीमध्ये अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS एबीएस हे प्रकारचे ब्रेक्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन या गोष्टींची सुविधा सुद्धा म्हणते देण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा पार्किंग करतात तेव्हा पार्किंग करताना गाडी कशाला आदळू नये म्हणून रियर पार्किंग सेन्सर हे सुद्धा देण्यात आलेले आहेत ड्रायव्हरच्या सेफ्टीच्या दृष्टीने आणि ड्रायव्हर सेफ रहावा याकरिता सीट बेल्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि आपण पाहिलेच आहे की मजबूत स्टील बॉडी सुद्धा देण्यात आलेले आहे.
माइलेज आणि ईंधन क्षमता (Mileage & Fuel Capacity)
मित्रांनो या गाडीचे मायलेज अँड फ्युएल कॅपॅसिटी याबद्दल आपण बोलणार आहोत.
महेंद्र बोलेरो गाडी ही हायवेवर 17 ते 18 किलोमीटर प्रति लिटर एवढे ऍव्हरेज देते.
तसेच शहरांमध्ये 15 ते 16 किलोमीटर प्रति लिटर एवढी अवरेज देते.
या गाडीची टाकीची कॅपॅसिटी ही 60 लिटर देण्यात आलेली आहे.
ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि फीचर्स Technology & Advanced Features
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.
- टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (काही प्रकारांमध्ये उपलब्ध).
- ब्लूटूथ आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी.
- पॉवर विंडो (काही प्रकारांमध्ये).
- सेंट्रल लॉकिंग सिस्टम.
किंमत Price & Variants
Variants | Ex-Showroom price |
Bolero Neo Plus P4 (2184 cc, Diesel, Manual, 118 bhp) | Rs. 11.39 Lakh |
Bolero Neo Plus P10 (2184 cc, Diesel, Manual, 118 bhp) | Rs. 12.49 Lakh |
महिंद्रा बोलेरो गाडी ही तुम्ही गाव खेड्यांमध्ये नक्कीच वापरू शकतात तसेच मोठ्याला परिवारांमध्ये तुम्ही वापरू शकता आणि या गाडीच्या असणारे कमी मेंटेनन्स आणि जास्त मायलेज यांमुळे तुम्ही परिवारासाठी ही गाडी एकदम बेस्ट पर्याय आहे.