महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा

Mahanagar Palika Bharti कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) ने विविध पदांसाठी एकूण 490 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात सरकारी नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

पदसंख्या तपशील

खालील तक्त्यामध्ये पदांचे नाव आणि प्रत्येक पदासाठी उपलब्ध जागांची संख्या दिली आहे:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिओथेरपिस्ट 02
2 औषधनिर्माता (Pharmacist) 14
3 कुष्ठरोग तंत्रज्ञ 03
4 स्टाफ नर्स 78
5 क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician) 06
6 हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन 01
7 मानस उपचार समुपदेशक 02
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
9 लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक 06
10 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 58
11 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 12
12 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 08
13 चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) 12
14 अग्निशामक (फायरमन) 138
15 कनिष्ठ विधी अधिकारी 02
16 क्रीडा पर्यवेक्षक 01
17 उद्यान अधिक्षक 02
18 उद्यान निरीक्षक 11
19 लिपिक-टंकलेखक 116
20 लेखा लिपिक 16
21 आया (फिमेल अटेंडेंट) 02
एकूण 490

शैक्षणिक पात्रता व अनुभव

प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालीलप्रमाणे:

  • पद क्र.1 (फिजिओथेरपिस्ट): (i) MPTH (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन) (ii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.2 (औषधनिर्माता): (i) B.Pharm (ii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.3 (कुष्ठरोग तंत्रज्ञ): (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.4 (स्टाफ नर्स): (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM (ii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.5 (क्ष-किरण तंत्रज्ञ): (i) B.Sc (Physics) (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.6 (हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन): (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
  • पद क्र.7 (मानस उपचार समुपदेशक): (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology) (ii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.8 (प्रयोगशाळा तंत्रज्ञ): (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology) (ii) DMLT (iii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.9 (लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक): (i) B.Com (ii) 03 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.10 (कनिष्ठ अभियंता – स्थापत्य): स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.11 (कनिष्ठ अभियंता – विद्युत): विद्युत (Electrical) अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.12 (कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी): यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.13 (चालक-यंत्रचालक): (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स (iii) 03 वर्षांच्या अनुभवासह जड वाहनचालक परवाना
  • पद क्र.14 (अग्निशामक): (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
  • पद क्र.15 (कनिष्ठ विधी अधिकारी): (i) विधी पदवी (ii) 03 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.16 (क्रीडा पर्यवेक्षक): (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BPEd (iii) SAI कडील डिप्लोमा (iv) 03 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.17 (उद्यान अधिक्षक): (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.18 (उद्यान निरीक्षक): B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
  • पद क्र.19 (लिपिक-टंकलेखक): (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • पद क्र.20 (लेखा लिपिक): (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • पद क्र.21 (आया – फिमेल अटेंडेंट): (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयाची अट

01 जुलै 2025 रोजी:

  • पद क्र. 13 आणि 14 साठी: 18 ते 30 वर्षे
  • इतर सर्व पदांसाठी: 18 ते 38 वर्षे
  • वयात सूट: मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट मिळेल.

नोकरी ठिकाण

सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण कल्याण डोंबिवली असेल.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
  • माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व तपशील आणि सूचना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a Comment